esakal | बंद मोडून काढण्याची भाषा करणारे मूर्ख - संजय राऊत | Sanjay raut
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut

बंद मोडून काढण्याची भाषा करणारे मूर्ख - संजय राऊत

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: "देशातला शेतकरी (farmer) आणि शेतीवर अवलंबून असलेला समाज न्यायाच्या अपेक्षेने आपल्याकडे पाहतोय. महाराष्ट्र न्यायप्रिय राज्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवून बंद (Maharashtra bandh) पुकारला आहे. राज्यातल बंद १०० टक्के यशस्वी होईल" असा दावा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी केला आहे. "कोणत्या बसेस फुटल्या हे मला माहित नाही. लोकांचा संताप समजून घेतला पाहिजे" असे राऊत म्हणाले.

"बंदला आमचा पाठिंबा नाही. अशी राजकीय विधाने कुणी करत असेल तर त्यांनी आपण या देशाचे खरे नागरिक आहोत का? शेतकऱ्यांचं देण लागतो का? हा प्रश्न विचारला पाहिजे. बंद मोडून काढण्याची भाषा करणारे मूर्ख आहेत. कोणाला वाटतं असेल तर त्यांनी रस्त्यावर येऊन दाखवावं" असं आव्हान राऊत यांनी दिलं आहे.

हेही वाचा: Maharashtra Bandh : उद्योजक व व्यापाऱ्यांचा विरोध

"लखीमपूरमध्ये मंत्रीपुत्राने शेतकऱ्यांना आपल्या गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात अशी जीपगाडी कोणाकडे असेल, तर त्यांनी रस्त्यावर आणावी" असे राऊत म्हणाले. "शिवसेना, काँग्रेस राष्ट्रवादी पूर्ण ताकतीने बंदमध्ये सहभागी झाले आहेत. लोक उत्सफुर्तपणे बंदमध्ये सहभागी होत आहेत" असे राऊत यांनी सांगितले.

हेही वाचा: 'विमानतळाचे खरे श्रेय नारायण राणेंचेच'

शिवसैनिक बंदसाठी तोडफोड करत असल्याच्या प्रश्नावर म्हणाले की, "युनियन्स असतात, विरोधाचे किडे वळवळत असतात. हा राजकीय बंद नाही. शेतकऱ्यांसाठी पुकरालेला बंद आहे. शेतकऱ्यांनी अन्न पिकवलं नाही, तर बसगाड्या रस्त्यावर काढा सांगणारे उपाशी मरतील. या देशाचा आर्थिक ढाचा हलून जाईल. आपण शेतकऱ्यांसाठी एक दिवस बंद पुकारणार नसू, तर जय जवान-जय किसान या घोषणेला अर्थ नाही"

loading image
go to top