esakal | Maharashtra Bandh : अचानक बंद पुकारणे अयोग्य; उद्योजक व व्यापाऱ्यांचा विरोध
sakal

बोलून बातमी शोधा

maharashtra band

Maharashtra Bandh : उद्योजक व व्यापाऱ्यांचा विरोध

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

मुंबई : कोरोनातून (coronavirus) आताच आपण सर्व व्यापारी आणि उद्योजक कुठेतरी जेमतेम बाहेर पडत आहोत. अशातच सणासुदीच्या काळात अचानकपणे मध्येच बंद पुकारणे योग्य नाही. असे सांगत महाराष्ट्रातील बंदला (maharashtra bandh) उद्योजक व व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी (lakhimpur kheri) इथं झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस (shivsena, NCP, congress) या ३ पक्षांनी पुकारलेल्या या बंदला विविध शहरांतील व्यापाऱ्यांनी मात्र आक्रमकपणे विरोध दर्शवला आहे.

बंद करून काय साध्य होणार?

जी घटना उत्तर प्रदेशात घडली त्या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो, त्याचे समर्थन कुणालाही करता येणार नाही. मात्र त्यासाठी आपण आंदोलन करा... मोर्चे काढा, पण संपूर्ण महाराष्ट्र बंद करू नका, बंद करून काय साध्य होणार?' असा प्रश्न व्यापारी असोसिएशनकडून विचारण्यात आला आहे.

हेही वाचा: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची जागा अखेर ठरली!

महाराष्ट्रातील तमाम जनतेला बंद करून वेठीस धरू नका

आतापर्यंत जे बंद झाले त्यास कधीही सरकारने दुजोरा दिला नाही. आता आपल्याच पार्टीचे सरकार आहे. तरी कृपया महाराष्ट्रातील तमाम जनतेला बंद करून वेठीस धरू नका. सरकार आपलेच आहे, पोलीसही आपलेच आहेत आणि बंद देखील आपल्याच सरकारमधील तिन्ही पक्षांनी केला आहे .आतापर्यंतच्या अनुभवानुसार सरकार बंद हाणून पाडते. परंतु ह्या खेपेस बंद पुकारणारेच बंदची अंमलबजावणी करणार? आम्ही दाद कोणाकडे मागायची? आधीच नुकसानग्रस्त असताना सगळ्यांना मदतीची गरज असताना बंद पुकारणे योग्य नाही. शेतकऱ्यांपासून लघुउद्योग, व्यापारी व ज्यांचे हातावर पोट आहे या सर्वांना नुकसान भरपाई कोण देणार?' असा उद्विग्न सवालही स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनकडून उपस्थित करण्यात आला आहे.

हेही वाचा: Bharat Bandh: देशभर शेतकरी संघटना रस्त्यांवर; बंदला संमिश्र प्रतिसाद

loading image
go to top