35 Bhondubabas Booked in 2 Months
esakal
नाशिक : राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या भोंदू अशोक खरात प्रकरणाला रविवारी (ता. १७) दोन महिने पूर्ण होत असून, या कालावधीत राज्यभरात ३५ भोंदूबाबांविरोधात गुन्हे दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) या गुन्ह्यांचे संकलन केले असून, राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी याबाबत माहिती दिली. 'अंनिस'ने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, की अशोक खरात प्रकरणानंतर राज्यात भोंदूबाबांविरोधात कारवाया सुरू झाल्या आहेत.