महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! रत्नागिरी-रायगडमधील तीन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार

Maharashtra Gets Blue Flag Award for 3 Beaches : २०२६-२७ या पर्यटन हंगामासाठी आंतरराष्ट्रीय ब्ल्यू फ्लॅग ज्युरीने या तिन्ही किनाऱ्यांची निवड केली आहे. त्यामुळे जागतिक दर्जाच्या स्वच्छ आणि पर्यावरणपूरक समुद्रकिनाऱ्यांच्या यादीत महाराष्ट्राचं नाव पहिल्यांदाच झळकणार आहे.
Maharashtra Blue Flag Award

Maharashtra Blue Flag Award

esakal

Updated on: 

महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्रासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्यातील तीन समुद्रकिनाऱ्यांना पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार जाहीर झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील लाडघर आणि गुहागर, तर रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन या समुद्रकिनाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. २०२६-२७ या पर्यटन हंगामासाठी आंतरराष्ट्रीय ब्ल्यू फ्लॅग ज्युरीने या तिन्ही किनाऱ्यांची निवड केली आहे. त्यामुळे जागतिक दर्जाच्या स्वच्छ आणि पर्यावरणपूरक समुद्रकिनाऱ्यांच्या यादीत महाराष्ट्राचं नाव पहिल्यांदाच झळकणार आहे.

Loading content, please wait...