
HSC Exam: परिक्षेआधीच विद्यार्थ्यांने उचलले टोकाचे पाऊल
महाराष्ट्र स्टेट बोर्डाची बारावीची परीक्षा आज 21 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. सर्वत्र विद्यार्थी परीक्षेची तयारी करत आहे. दरम्यान दुर्दैवी घटना समोर आली आहे. अवघ्या काही तासांवर बारावीची परीक्षा आलेली असताना औरंगाबादमध्ये एका विद्यार्थ्यांने अभ्यासाच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबजनक घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबादमधील एन 8, सिडको भागातील गुरुनगर हौसिंग सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. आमन रविंद आहेरेवाल असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. बारावीची परीक्षा असल्यामुळे आमन आहेरेवाल हा अभ्यास करत होता. रात्री तो नेहमीप्रमाणे आपल्या खोलीत अभ्यास करण्यासाठी गेला.
मात्र तो सोमवारी सकाळी खाली आलाच नाही. दुपारी जेवणासाठी आजोबा अमनला बोलावण्यासाठी गेले असता, अमना फासावर लटकलेला दिसला. त्यास नातेवाइकांनी बेशुद्ध अवस्थेत घाटी रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
दरम्यान अमनने परीक्षेच्या तणावातून आत्महत्या केली असल्याचा अंदाज पोलिसांना आहे. विशेष म्हणजे आत्महत्या करण्याचा त्याने आधीच निर्णय घेतला होता आणि रविवारी रात्री आत्महत्या करण्याची तयारी केली.
अमनने पहिल्या मजल्यावरून अॅल्युमिनिअमची शिडी तिसऱ्या मजल्यावरील त्याच्या अभ्यासाच्या खोलीत घेऊन गेला होता. त्याच शिडीच्या सहाय्याने त्याने छताच्या हुकाला ओढणी बांधून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.