
हिंगोली : इयत्ता दहावी-बारावीची परीक्षा कॉपीमुक्त व्हावी, यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नवा पॅटर्न राबविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षक आणि केंद्र संचालक आता दुसऱ्या शाळा-महाविद्यालयांतील असणार असल्याचे जिल्हाधिकारी आभिनव गोयल यांनी दक्षता समितीच्या बैठकीत शुक्रवारी (ता. २४) सांगितले.