esakal | अर्थसंकल्पावर भाजप आमदार मिसाळ म्हणाल्या...
sakal

बोलून बातमी शोधा

अर्थसंकल्पावर भाजप आमदार मिसाळ म्हणाल्या...

- महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर भाजप आमदार माधुरी मिसाळ यांनी सरकारवर साधला निशाणा.

अर्थसंकल्पावर भाजप आमदार मिसाळ म्हणाल्या...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात केवळ पोकळ घोषणा असून, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी ठोस निधीची तरतूद करण्यात आलेली नाही, अशी टीका आमदार माधुरी मिसाळ यांनी केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे मेट्रोसाठी केलेली तरतूद तुटपुंजी आहे, पुण्यातील रिंग रोडसाठी केंद्र सरकारच्या भरवशावर निधी दिला जाणार आहे, विमानतळासाठी पुरेशी तरतूद नाही, महिला आणि समाज कल्याणसाठी निधी अपुरा आहे, शिष्यवृत्ती वाटपासाठीच तो कमी पडेल, एचसीएमटीआर, नदीकाठ सुधारणा, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन आदी पुणे शहरातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांसाठी तरतुद केलेली नाही.

राज्यात पट्रोल-डिझेल महागणार; मुंबई, पुण्यात घरखरेदी स्वस्त

तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवर एक रुपया अतिरिक्त कर लावल्याने महागाई वाढणार असून, त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावण्यात आली आहे. आमदारांचा विकासकामांसाठी निधी 2 कोटीवरुन 3 कोटी रुपयांपर्यंत वाढविला आहे. मात्र, शहरी भागातील आमदारांना दरवर्षी मिळणार्‍या पाच कोटी रुपयांच्या विशेष निधीला कात्री लावली आहे. हा अर्थसंकल्प गेली पाच वर्षे सुरू असलेल्या विकासकामांना आणि योजनांना खीळ घालणारा आणि समाजातील सर्व स्तरावरील नागरिकांची घोर निराशा करणारा आहे.