Budget 2022: अर्थसंकल्पातील पंचसूत्री; जाणून घ्या प्रमुख घोषणा

Budget 2022: अर्थसंकल्पातील पंचसूत्री; जाणून घ्या प्रमुख घोषणा

Budget 2022: सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Budget Session) सुरू आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2022) मांडला आहे. कोरोना काळानंतरचा हा अर्थसंकल्प असल्यानं या अर्थसंकल्पाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं होतं. या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून अर्थमंत्री अजित पवार यांनी केलेल्या मुख्य घोषणा :

Budget 2022: अर्थसंकल्पातील पंचसूत्री; जाणून घ्या प्रमुख घोषणा
Maharashtra Budget Session Live : आरोग्य सुविधांवर ११ हजार कोटींचा निधी
  • संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी २५० कोटींची तरतूद

  • राज्य सरकारकडून विकासाची पंचसूत्री राबवण्यात येणार आहे. एक ट्रिलियन डॉलरचे बजेट असणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य बनेल, अशीही घोषणा अजित पवार यांनी केली आहे.

  • कृषि क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी भरीव तरतूद

  1. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांच्या दिलेल्या वचनाची पूर्ती या आर्थिक वर्षात करणार

  2. अनुदानाचा लाभ २० लाख शेतकऱ्यांना

  3. शेतकऱ्यांची कर्जमाफी करणाऱ्याचा सरकारचा निर्णय

  4. शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज पुरविण्याच्यामुळे घोषणेमुळे पीककर्जात वाढ

  5. मूल्य साखळी योजनेसाठी १ हजार कोटी रुपये

  6. शेततळ्याच्या अनुदानात वाढ करून ७५ हजार कोटी रुपये

  • हिंगोली बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र स्थापन होणार

  • जलसंपदा विभागाला १३ हजार ५५२ कोटी; २०२२-२३ मध्ये २८ सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याचा मानस

Budget 2022: अर्थसंकल्पातील पंचसूत्री; जाणून घ्या प्रमुख घोषणा
राणेंनी शहांना फोन केल्याचा दावा खोटा; खुद्द पोलिसांनी कोर्टाला सांगितलं
  • आरोग्य

  1. आरोग्य सुविधांवर ११ हजार कोटी रुपयांचा खर्च करणार

  2. अनेक जिल्ह्यांच्या ठिकाणी नवजात शिशू आणि माता यांच्यासाठी स्त्री रुग्णालये स्थापन करण्यात येतील

  3. सर्व जिल्ह्यात महिला रुग्णालय उभारणार

  • मनुष्यबळ विकास

  1. लता मंगेशकर संगीत विद्यापीठासाठी कलिना विद्यापीठात जागा आणि १०० कोटींचा निधी

  2. जागतिक डिजिटल क्रांतीच्या युगात रोजगार क्षम मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी महसूल विभागाला ५०० कोटी रुपयांची तरतूद

  3. स्टार्टअपला सुरुवातीचे भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी १०० कोटींचा स्टार्टअप फंड

  4. तृतीयपंथी ओळखपत्र आणि शिधापत्रिका द्यायची मोहीम राबवणार

  5. बार्टीला 250 कोटींचा निधी

  6. नालेसफाईसाठी स्वयंचलित यंत्रणा

  7. सामाजिक न्याय विभागाला 2 हजार 876 कोटींची तरतूद

  8. 3 लाख 30 हजार नोकऱ्या निर्माण करण्याचं लक्ष्य

  • दळण वळण

  1. पुणे रिंग प्रकल्पासाठी १ हजार ९०० हेक्टर जमीन अधीग्रहण - १ हजार ५०० कोटी

  2. स्टी महामंडळ वेतन साठी ४१०७ कोटी दिले

    ३००० पर्यावरण पूरक नवीन बस गाड्या उपलब्ध करून देण्याचा मानस

  3. नगरविकास विभागास ८ हजार ८०० कोटी रुपये

  4. शिर्डी विमानतळ - १५० कोटी रुपयांचा निधी

  5. अमरावती विमानतळ रात्रीची उड्डाणसेवा नवीन इमारत बांधकाम, गडचिरोलीत नवीन विमानतळ

  6. सन २०२१ ते २०२५ महाराष्ट्र ईलेक्ट्रीक वाहन धोरण

उद्योग

  • विद्युत वाहनांची नोंदणी 157 टक्क्यांनी वाढली आहे.

  • कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांना महिला बचत गटांच्या माध्यमातून भांडवलच्या कर्जावरील व्याजाची परतफेड करता येईल.

  • एकूण 15 हजार 215 कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com