राणेंनी शहांना फोन केल्याचा दावा खोटा; खुद्द पोलिसांनी कोर्टाला सांगितलं

Narayan rane
Narayan rane sakal

मुंबई: दिशा सालियनबाबत केलेल्या विधानांमुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे (Nitesh Rane) अडचणीत आले होते. या प्रकरणी त्यांच्याविरोधात दाखल केलेला फौजदारी गुन्हा रद्द करण्यासाठी त्यांनी आज मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. (Narayan Rane) नऊ तासांच्या चौकशीनंतर बाहेर आलेल्या नारायण राणे यांनी आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना फोन केल्यावर मग त्यांना सोडण्यात आल्याचं विधान केलं होतं. मात्र, त्यांचं हे विधान खोटं असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली आहे.

Narayan rane
आता लक्ष्य मुंबई! प्रदेश कार्यालयासमोरच फडणवीसांचा एल्गार

काय म्हणाले पोलीस?

या प्रकरणातील आरोपींना पाच मार्च रोजी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. या तपासात ओरोपींनी सहकार्य केलं नाही. आपल्याकडे असलेली माहिती आपण सीबीआयला देऊ अशी खोटी विधानं वारंवार त्यांच्याकडून करण्यात आली तसेच चौकशी संपल्यानंतर मीडियाशी बोलताना आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना चौकशी दरम्यान फोन केला असल्याचं खोटं विधान देखील केलेलं आहे, अशी माहिती पोलिसांनी न्यायलयाला दिली आहे.

पुढे पोलिसांनी म्हटलंय की, आरोपींच्या बोलण्याचा एकूण रोख साक्षीदारांवर आणि तपास अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होता. त्यामुळे तपासात अडथळे निर्माण होत असून त्यांना अटकपूर्व जामीन दिल्यास ते भविष्यात तपासात कोणतंही सहकार्य करणार नाही, असंही पोलिसांनी म्हटलंय.

Narayan rane
'दिशा'बाबतचं वक्तव्य भोवलं! गुन्हा रद्द करण्यासाठी राणेंची हायकोर्टात धाव

काय म्हणाले होते नारायण राणे?

दिशा सालियान प्रकरणावर आपलं म्हणणं सांगण्यासाठी पोलीस ठाण्यात यावं अशी नोटीस पोलिसांनी दिली होती. आम्ही पत्रकार परिषदेत बोललो होतो की, तिने आत्महत्या केली नसून, तिची हत्या आहे. तिच्या खऱ्या आरोपींना शिक्षा व्हावी. मात्र महापौर पेडणेकर तिच्या आई वडीलांकडे गेले. त्यानंतर त्यांनी दिशाच्या आई वडीलांना तक्रार द्यालया प्रवृत्त केलं. दिशाची आई म्हणते राणे पिता पुत्रांमुळे आपली बदनामी होतेय. ही खोटी तक्रार पोलीसांनी घेतली आणि आम्हाला नोटीस दिली. आमची ९ तास चौकशी झाली. आम्ही सांगत होतो की, मी केंद्रीय मंत्री आहे, नितेश राणे आमदार आहे मात्र तरी पोलीस सोडत नव्हते. त्यानंतर आम्ही अमित शहांना फोन केला. त्यानंतर आमचा जबाब नोंदवल्यानंतर पोलिसांनी आम्हाला सोडलं. दिशा सालियानच्या हत्येबद्दल जिथे आवाज उठवता येईल तिथे उठवण्याचा प्रयत्न करु असं राणे म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com