Maharashtra Budget 2024: मागेल त्याला सौर कृषि पंप; अजित पवारांच्या पोतडीत शेतकऱ्यांसाठी आहेत 'या' महत्त्वाच्या घोषणा

राज्यातील शेतकऱ्यांसाठी अर्थमंत्री अजित पवार यांनी अनेक घोषणा केल्या आहेत.
Ajit Pawar_Maharashtra Budget 2024
Ajit Pawar_Maharashtra Budget 2024

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाटी अर्थमंत्री अजित पवार यांनी अनेक घोषणा केल्या आहेत. अर्थसंकल्प मांडताना केलेल्या भाषणात त्यांनी या बाबी स्पष्ट केल्या आहेत. या घोषणांनुसार सर्वात महत्वाची घोषणा म्हणजे, 'नमो शेतकरी महासन्मान निधी योजनें'तर्गत 84 लाख 57 हजार शेतकरी कुटुंबांना पहिल्या हप्त्यापोटी 1 हजार 691 कोटी 47 लाख रुपये देण्यात येणार आहेत. (Maharashtra Budget 2024 what announcements did Ajit Pawar make for the farmers know in detail)

Ajit Pawar_Maharashtra Budget 2024
Maharashtra Budget 2024 : आशियाई स्पर्धेत पदक जिंकणारे खेळाडू बनणार करोडपती! अजित पवारांची बजेटमध्ये मोठी घोषणा

अजित पवारांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या इतर घोषणा?

  1. अटल बांबू समृध्दी योजनंतर्गत १० हजार हेक्टर क्षेत्रावर बांबूची लागवड होणार

  2. जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत 5 हजार 700 गावांमधील 1 लाख 59 हजार 886 कामांना मंजूरी

  3. 2024-25 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाला 245 कोटी रुपये

  4. वन विभागास २ हजार ५०७ कोटी रुपये

  5. मृद व जलसंधारण विभागास ४ हजार २४७ कोटी रुपये

  6. शेतकऱ्याला दिवसा वीज पुरवठ्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी योजनेअंतर्गत 7 हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट

  7. शेतकऱ्यांसाठी 'मागेल त्याला सौर कृषि पंप' या नव्या योजनेंतर्गत ८ लाख ५० हजार नवीन सौरकृषी पंप

  8. राज्यात सर्व उपसा सिंचन योजनांचे येणाऱ्या दोन वर्षात सौर उर्जीकरण

  9. सुमारे 37 हजार अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच देणार

  10. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेअंतर्गत १ लाख शेतकऱ्यांना सौर उर्जा कुंपणासाठी अनुदान

  11. 2024-25 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता ऊर्जा विभागाला 11 हजार 934 कोटी रुपये

  12. 'नमो शेतकरी महासन्मान निधी योजना' अंतर्गत 84 लाख 57 हजार शेतकरी कुटुंबांना पहिल्या हप्त्यापोटी 1 हजार 691 कोटी 47 लाख रुपये

  13. नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाच्या 6 हजार कोटी रुपये किमतीच्या दुसऱ्या टप्प्यास मान्यता

  14. 39 सिंचन प्रकल्पांची कामे पूर्ण करुन 2 लाख 34 हजार हेक्टर सिंचन क्षमता स्थापित करणार

  15. बळीराजा जलसंजीवनी योजनेत 46 प्रकल्प पूर्ण झाले असून मार्च 2025 पर्यंत आणखी 16 प्रकल्प पूर्ण होणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com