
राज्य अर्थसंकल्पात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या घटक कार्यक्रम तुरतुदींत गेल्या वर्षांच्या तुलनेत अनुक्रमे ४२ आणि ४० टक्के भरीव वाढ करण्यात आली आहे. यात अनुसूचित जातींच्या घटक कार्यक्रमांसाठी २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात २२ हजार ५६८ कोटी रुपयांची तर अनुसूचित जमातींसाठी २१ हजार ४९५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.