
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली असून, आज पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड हे हातात बेड्या घालून विधानभवनात आल्याने एकच चर्चा रंगली. अमेरिकेत भारतीयांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात प्रतीक म्हणून तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असल्यामुळे हातात बेड्या घालून आल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी माध्यमांना सांगितले.