Maharashtra Budget Session : नव्या राज्यपालांकडून राज्य सरकारचं कौतुक; अभिभाषणातील महत्त्वाचे मुद्दे

महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे.
Maharashtra Budget Session Governor Ramesh Bais speech CM Eknath Shinde Devendra Fadnavis
Maharashtra Budget Session Governor Ramesh Bais speech CM Eknath Shinde Devendra Fadnavis

महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणाने या अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. यावेळी त्यांनी सरकारने आत्तापर्यंत घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयावर भाष्य केलं आहे. तसेच निर्णयाचे कौतुक देखील केले आहे. (Maharashtra Budget Session Governor Ramesh Bais speech CM Eknath Shinde Devendra Fadnavis)

कोरोनानंतर युवकांना रोजगार देण हा सरकारचा हेतु असल्याचे सांगत ७५ हजार नोकर भरतीचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे राज्यपाल बैस यांनी अभिभाषणा रम्यान सांगितले.

काय म्हणालेत राज्यपाल?

  • माझं सरकार छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, आंबेडकर यांच्यासह अनेक समाज सुधारकांच्या सिद्धांतावर चालले आहे.

  • सीमावर्ती भागात राहणाऱ्या लोकांना सेवा सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे.

  • कोरोना नंतर युवकांना रोजगार देणे हा सरकारचा हेतू आहे.

  • 75 हजार नोकर भरतीचा निर्णय घेतला आहे.

  • जानेवारी 2023 मध्ये डाओसमध्ये जाऊन करार केले आहेत.

  • युवकांना कुशल बनवण्यासाठी गोदिया आणि गडचिरोली येथे दोन ट्रेनिंग सेंटर उभे केलेत.

  • महाराष्ट्र देशाचे प्रमुख औद्योगिक राज्य आहे. निर्यातेत राज्य अग्रेसर राहिले आहे. माझ्या राज्याने 2026-27 पर्यत 5 प्रिलियंट डॉलर पर्यत पोहोचण्याचा निर्धार केला आहे. असही राज्यपाल यावेळी म्हणाले.

  • राज्यात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. मुंबईत मेट्रो लाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई 30 किलोमीटर, नागपूर 40 किलोमीटर आणि पुण्यात मेट्रो सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. असही राज्यपाल बैस यांनी यावेळी सांगितलं.

आपला दवाखाना सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

नीती आयोगाच्या धर्तीवर मित्राची स्थापना करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला.

531 किलोमीटर समृध्दी महामार्गाचे उदघाटन केले आहे.

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून रस्ते तयार करण्याचा निर्णय घेतलाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com