विधानसभेत सात मंत्री अनुपस्थित; आमदारांकडून तीव्र नाराजी व्यक्त: maharashtra budget session | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Budget Session: विधानसभेत सात मंत्री अनुपस्थित; आमदारांकडून तीव्र नाराजी व्यक्त

Maharashtra Budget Session: विधानसभेत सात मंत्री अनुपस्थित; आमदारांकडून तीव्र नाराजी व्यक्त

राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाचा आज तिसऱ्या आठवड्यातील तिसरा दिवस आहे. दरम्यान, मोठी अपडेट समोर आली आहे. विधानसभेत सात मंत्री उपस्थित नाहीत. त्यामुळे तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. (maharashtra budget session Seven ministers were absent in the assembly)

विधानसभेत सात मंत्री उपस्थित नसल्यामुळे विशेष बैठकीचे कामकाज उद्यावर ढकलण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आमदारांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

मंत्री पदासाठी पुढे पुढे जातात पण कामकाजाच्या वेळी अनुपस्थितीत का राहतात भाजप आमदार कालिदास कोळमकर सरकारला घरचा आहेर दिला आहे.

सभागृहात केवळ एकाच लक्षवेधीला उत्तर देण्यासाठी एकच मंत्री उपस्थित इतर लक्षवेधीसाठी मंत्री अनुपस्थित असल्यामुळे तालिकाध्यक्ष संजय शिरसाट यांनीदेखील तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सभागृहात उपस्थित सदस्यांची जी भावना आहे तीच नाराजीची भावना आपली देखील असल्यास तालिका अध्यक्षांचे मत आहे.

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनात अर्थसंकल्पासह विविध मुद्द्यांवर चर्चा होत असताना काल अब्दुल सत्तार यांच्यापासून ते जुन्या पेन्शनवरुन विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळाले. शीतल म्हात्रे यांच्या मॉर्फ व्हिडीओ प्रकरणाचे पडसाद आजही विधानसभेत उमटण्याची शक्यता आहे.