CM शिंदे फडणवीसांची डोकेदुखी वाढली; आंदोलकांचा बैठकीला जाण्यास नकार: Farmers Long March | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Farmers Long March

Farmers Long March : CM शिंदे फडणवीसांची डोकेदुखी वाढली; आंदोलकांचा बैठकीला जाण्यास नकार

किसान मोर्चाचे शिष्टमंडळ मुंबईत जाणार नाही तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सबंधित मंत्र्यांनी मोर्च्याच्या ठिकाणी यावं, अशी भूमिका माजी आमदार जे पी गावित यांनी मांडली आहे. सरकार सन्मानाने वागणूक देत नाही, आम्ही चर्चेसाठी जाणार नाही, सामान्य माणूस सरकारला झुकावू शकतो हे दाखवून देणार असा इशाराही गावित यांनी दिला आहे. (Farmers Long March)

किसान मोर्चाच्या शिष्टमंडळाची बैठक काल होणार होती. मात्र, कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ही बैठक रद्द करण्यात आली. दरम्यान, आता आंदोलकांनी बैठकीत जाण्यास नकार दिला आहे. मोर्चा घेऊन मुंबईत जाणार मात्र चर्चेसाठी मंत्र्यांनी यावे, असे गावित म्हणाले आहेत.

संपकरी सरकारी कर्मचाऱ्यांच्या बैठकीला सरकारने प्राधान्य दिलं, मात्र शेतकऱ्यांच्या वेदनेकडे बघायला सरकारला वेळ नाही, असं म्हणत, आंदोलक शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

किसान सभेच्या शेतकरी लाँग मार्चचा आज चौथा दिवस आहे. हा मोर्च मुंबईच्या दिशेने येत आहे. सध्या हा मोर्चा इगतपुरी तालुक्यातील घाटन देवी गावात दाखल झाला आहे. घाटन देवीतून हा मार्च आज कसारा बायपासमार्गे पुढे प्रवास सुरु करणार आहे.

दरम्यान, आज दुपारी किसान सभेच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक होणार आहे.

पाच वर्षानंतर नाशिक ते मुंबई लाँग मार्च

पाच वर्षांपूर्वी शेतकऱ्यांनी नाशिकमधून लाँग मार्च काढला होता. विविध मागण्यांसाठी हजारो शेतकरी महिला भगिनी पायपीट करत नाशिकहून मुंबईला पोहोचले होते. कुणाचे पाय रक्तबंबाळ झाले होते तर कुणाचे पाय सुजलेले होते.

Employees Strike: संप करणाऱ्यांना तात्काळ अटक करण्याची तरतुद; मेस्मा कायदा घाईत मंजूर

एवढं करुन काहीही उपयोग झाला का? असं विचारण्याची वेळ आली आहे. कारण पुन्हा त्याच मागण्यांसाठी हे सर्व शेतकरी मजूर आणि आदिवासीबांधव पुन्हा एकदा डांबरी रस्त्यावरुन उन्हाचा चटका सहन करत मुंबईला निघाले आहेत.