Maharashtra Housing Law : सोसायटी स्थापन न केल्यास थेट गुन्हे; विकसकांविरोधात राज्य सरकारचा कडक कायदा!

Society Formation : लहान इमारती बांधल्यानंतर विकसकांनी सोसायटी स्थापन न केल्यामुळे फ्लॅटधारक आणि गाळेधारकांना वर्षानुवर्षे त्रास सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कठोर भूमिका घेत ‘महाराष्ट्र मालकी हक्काच्या फ्लॅट्स सुधारणा व विधिग्राह्यीकरण विधेयक-२०२५’ विधान परिषदेत मंजूर केले आहे.
Maharashtra Govt Takes Tough Stand Against Builders

Maharashtra Govt Takes Tough Stand Against Builders

sakal
Updated on

नागपूर : लहान इमारतींची उभारणी केल्यानंतर अनेक विकसक (बिल्डर) रहिवासी सदस्यांची सोसायटी स्थापन करून देत नाहीत. यामुळे लहानसहान गोष्टींवरून मोठे वाद निर्माण होतात. भविष्यात विकसकाने लहान गाळेधारकांची सोसायटी स्थापन न केल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची तरतूद असलेले विधेयक आज विधान परिषदेमध्ये मंजूर करण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com