मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक जाहीर होण्याच्या आधीची वेळ साधत राज्य सरकारने निवडणुकीमध्ये फायदा होईल, असे निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतले. या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने आज दुपारी चार वाजता पत्रकार परिषद आयोजित केली होती.