दुष्काळात सरकारकडून मोठा दिलासा! ४२ लाख शेतकऱ्यांना पुढचे तीन महिने मिळणार पाच किलो मोफत धान्य, मंत्रिमंडळाचा निर्णय...

Maharashtra Cabinet Decision : प्रत्येक व्यक्तीला महिन्याला पाच किलो धान्य दिले जाणार असून, त्यात तीन किलो तांदूळ आणि दोन किलो गव्हाचा समावेश असेल. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मंजुरी देण्यात आली आहे.
Maharashtra Cabinet Decision

Maharashtra Cabinet Decision

esakal

Updated on: 

राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत येणाऱ्या आणि थेट लाभ हस्तांतरण (DBT) योजनेत समाविष्ट नसलेल्या ३३ जिल्ह्यांतील ४२ लाख ३० हजार ७८३ शेतकरी कुटुंबांना पुढील तीन महिने मोफत धान्य मिळणार आहे. प्रत्येक व्यक्तीला महिन्याला पाच किलो धान्य दिले जाणार असून, त्यात तीन किलो तांदूळ आणि दोन किलो गव्हाचा समावेश असेल. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मंजुरी देण्यात आली आहे.

Loading content, please wait...