

Maharashtra Cabinet approves major decisions, including ₹5,000 advance assistance for drought-hit farmers, irrigation development, EV manufacturing incentives and infrastructure projects
esakal
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासह राज्यातील विविध विकासकामांना गती देणारे महत्त्वाचे निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले आहेत. राज्यातील दुष्काळग्रस्त ३०४ तालुक्यांमधील सुमारे दीड कोटी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांचे अग्रीम देण्यात येणार आहे. याशिवाय दिव्यांगांच्या कल्याणासाठी निधीची तरतूद, जलसंपदा विभागातील पदरचना, पुण्यात राष्ट्रीय प्रदर्शन केंद्राची उभारणी, इलेक्ट्रिक वाहन निर्मिती आणि विमानसेवेला चालना देण्यासह विविध प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे.