Political News I राज्यात शिंदे गटाच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी 'या' तारखेला होण्याची शक्यता | Eknath Shinde Government News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde Government News

या सरकारमध्ये मंत्रिपद मिळवण्यासाठी अनेक आमदारांचे प्रयत्न सुरू आहेत.

राज्यात शिंदे गटाच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी 'या' तारखेला होण्याची शक्यता

राज्यातील सत्ताबदलनंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर महाराष्ट्रात एकनाथ शिंदे-फडणवीस सरकार कारभार पाहत असून अद्याप या मंत्रीमंडळाचा विस्तार झालेला नाही. दरम्यान, या मंत्रिमंडळाच्या शपथविधी संदर्भात बातमी समोर येत आहे. हा शपथविधी येत्या १९ जुलै रोजी होणार असल्याचे माहिती मिळत आहे. (Eknath Shinde Government News)

यासंर्भात राज्य सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नसली, तरी १८ जुलै रोजी राष्ट्रपतिपदासाठीची निवडणूक होणार असून, त्याच्या दुसऱ्या दिवशी मंत्रीमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. राज्यात शिवसेनेतील बंडानंतर जोरदार नाट्यमय घडामोडी घडल्या आणि अखेर एकनाथ शिंदे गट तसेच भाजप यांचे सरकार सत्तेवर आले आहे.

हेही वाचा: शिराळ्यातील वाकुर्डे खिंडीत दरड कोसळल्याने वाहतुकीची कोंडी

या सरकारमध्ये मंत्रिपद मिळवण्यासाठी अनेक आमदारांचे प्रयत्न सुरू असून, शिंदे आणि फडणवीस यांच्यात राज्यात तसेच दिल्लीतही बैठका पार पडल्या आहेत. दिल्लीत अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीदरम्यानही मंत्रीमंडळ विस्तारावर सविस्तर चर्चा झाल्याचे कळते. या बैठकीत मंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून, आता १९ जुलै रोजी शपथविधी पार पडणार असल्याचे समजते.

दरम्यान, १८ जुलै रोजी राष्ट्रपतिपदाची निवडणूक आहे. तत्पूर्वी 'एनडीए'च्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा १४ जुलै रोजी मुंबई भेटीचा कार्यक्रम निश्चित झाला आहे. त्यामुळे १८ जुलैला राष्ट्रपतिपदासाठीची निवडणूक झाली की त्याच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाला वेग येणार आहे. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

हेही वाचा: खामगाव : नदीकाठच्या ३६ गावांना सतर्कतेचा इशारा

Web Title: Maharashtra Cabinet Expansion Of Shinde Fadanvis Govt After Presidential Election

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top