
Maharashtra Cabinet extends popular farmer scheme till 2027 big relief announced
Esakal
राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत आज अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यात शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आलाय. उपसा जलसिंचन योजनेत वीज दर सवलतीला मुदतवाढ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला गेला. याशिवाय नागरी पायाभूत सुविधा विकास कर्ज योजनेंतर्गत हुडकोकडून २०० कोटींचं कर्ज घेण्यास मान्यता दिली आहे. तसंच अकोला जिल्ह्यात लघु पाटबंधारे प्रकल्प योजनांच्या दुरुस्ती खर्चाची तरतूद केली आहे.