esakal | मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला; 'या' तारखेला होणार 18 जणांचा शपथविधी 
sakal

बोलून बातमी शोधा

Congress, NCP

शिवसेनेतील गुलाबराव पाटील, सुनील प्रभू, अनिल परब, रवींद्र वायकर, डॉ. सुजित मिणचेकर, उदय सामंत, दीपक केसरकर यांची नावे चर्चेत आहेत.

मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला; 'या' तारखेला होणार 18 जणांचा शपथविधी 

sakal_logo
By
मृणालिनी नानिवडेकर

मुंबई : ठाकरे सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार हिवाळी अधिवेशन संपताच 23 किंवा 24 डिसेंबर रोजी होणार असल्याचे सांगितले जाते. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील प्रत्येकी सहा जणांना शपथ देण्यात येणार आहे. मुंबईत हा शपथविधी होईल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शिवसेनेतील गुलाबराव पाटील, सुनील प्रभू, अनिल परब, रवींद्र वायकर, डॉ. सुजित मिणचेकर, उदय सामंत, दीपक केसरकर यांची नावे चर्चेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार, दिलीप वळसे पाटील, नवाब मलिक, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, दीपिका चव्हाण, अनिल देशमुख, सतीश चव्हाण यांची नावे निश्‍चित होण्याची शक्‍यता आहे.

भाजपकडून शिवाजी महाराजांच्या नावाला गालबोट

काँग्रेसमध्ये पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण, अमीन पटेल, बंटी पाटील, यशोमती ठाकूर, सुनील केदार यांच्या नावांचा विचार सुरू आहे. गृह खाते शिवसेनेकडेच राहील, असे समजते.

राहुल-सावरकर-रेप इन इंडिया, काय आहे यामागचे सत्य?