esakal | 'भाजपकडून शिवाजी महाराजांच्या नावाला गालबोट'
sakal

बोलून बातमी शोधा

Sachin Sawant Criticized on BJP in mumbai press Conference

भारतीय जनता पक्षाकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला गालबोट लावण्याचे काम केले असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गेल्या 5 वर्षात भाजपचे अनेक घोटाळे आम्ही समोर आणले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना नेहमी क्लीन चिट देण्याचे काम केले आहे.

'भाजपकडून शिवाजी महाराजांच्या नावाला गालबोट'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भारतीय जनता पक्षाकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला गालबोट लावण्याचे काम केले असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गेल्या 5 वर्षात भाजपचे अनेक घोटाळे आम्ही समोर आणले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना नेहमी क्लीन चिट देण्याचे काम केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अरबी समुद्रातील शिवाजी महाराज यांचे स्मारक व्हावे ही काँग्रेस सरकारची इच्छा होती. अरबी समुद्रातील शिवाजी महाराज स्मारक उभारणीत भ्रष्ट्राचार झाला आहे. महाराजांच्या स्मारकात घोटाळा करणाऱ्या भाजपला महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही. टेंडर निघाल्यानंतर वाटाघाटी करत पैसे कमी केले गेले. शिवस्मारकाचे स्पेसिफिकेशन कमी करण्यात आले असल्याचेही सावंत यांनी यावेळी सांगितले.

दिल्लीतील भडक्याच्या औरंगाबादेत ठिणग्या

अधिकाऱ्यांनी चौकशीची मागणी केली होती. चुकीच्या पद्धतीने टेंडर प्रक्रिया झाल्याचे विभागीय लेखापालांनी सांगितले होते. शासकीय सल्ला घेण्यासाठी विधी अधिकाऱ्यांची मदत न घेता खासगी कंपनीने नेमलेल्या विधी समितीचा सल्ला घेतला गेला. मुकुल रोहतगी यांनी शासनाला सल्ला दिला आणि तेच कोर्टातून स्टे उठवण्यासाठी कंपनीची बाजू मांडत होते, असेही सावंत यांनी यावेळी सांगितले.

दिपीकाचा नवा हॉलिवूड सिनेमा?

भाजप सावरकरांचा उपयोग राजकीय फायद्यासाठी करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांना सावरकर यांच्याबाबत किती माहिती आहे हे मला माहित नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 30 ऑगस्ट 1911 पर्यंतच्या सावरकर यांच्या बाबत आम्हाला आदर आहे. त्यानंतर सावरकर यांच्या विचारात बदल होत गेले ते आम्हाला मान्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

loading image