Manikrao Kokate Sports Minister: मोठी बातमी! माणिकराव कोकाटेंचा राजीनामा नाहीच; आता क्रीडामंत्रिपद सांभाळणार

Dattatray Bharne Agriculture Minister: दत्तात्रय भरणे यांना कृषीमंत्री पद देण्यात आलं आहे ; कोकाटेंवर कारवाई झाली नसल्याने विरोधकांकडून टीका सुरू
Manikrao Kokate
Manikrao Kokatesakal
Updated on

Maharashtra cabinet reshuffle: महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. अखेर माणिकराव कोकाटेंना क्रीडामंत्रिपद देण्यात आलं आहे. तर दत्तात्रय भरणे यांना कृषिमंत्रिपद देण्यात आलं आहे.

विधिमंडळात रम्मी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर माणिकराव कोकाटे चांगलेच अडचणीत आले होते. विरोधकांनी हा मुद्दा लावून धरत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. शिवाय, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलतानाही कोकाटेंनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने सरकारची अडचण झाली होती. त्यामुळे आता कोकाटेंचं मंत्रिपद नक्कीच जाणार अशीच सर्वत्र चर्चा होती.

मात्र सरकारने माणिकराव कोकाटेंवर आता दुसऱ्या खात्याची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे आता मुख्यमंंत्र्यांना माणिकराव कोकाटेंनी केलेल्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत, असा आरोपही विरोधकांनी केला आहे. तर कोकाटेंना मंत्रिपदावरून काढून टाकयला हवं, कारण त्यांनी शेतकऱ्यांचा अपमान केलेला आहे. हा व्यक्ती विधानसभेत रम्मी खेळत असेल तर त्याला मंत्रिपदावर ठेवणं सरकारला शोभतं का? अशी टीका विरोधकांनी केली आहे.

Manikrao Kokate
Suresh Dhas on Dhananjay Munde: धनंजय मुंडेंची पुन्हा मंत्रिमंडळात 'एन्ट्री' होणार? , सुरेश धसांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले ''आम्ही...''

राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे विधानसभेच्या सभागृहात केवळ ४२ सेकंद नव्हे, तर १८ ते २२ मिनिटे ऑनलाइन रमी खेळत होते, असा गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी केला होता. विधिमंडळाच्या चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाला असून, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून कारवाई करावी, असे खुले आव्हानही रोहित पवार यांनी केले होते.

Manikrao Kokate
Modi Cabinet Decisions: मोदी सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले मोठे निर्णय; अश्विनी वैष्णव यांनी दिली माहिती!

तर दरम्यान संकटात सापडलेल्या कोकाटे यांनी पाच दिवसांपूर्वी शनिदेवाच्या चरणी धाव घेतली होती. त्यांनी शनिमांडळ येथील प्रसिद्ध शनी मंदिरात अभिषेक व विशेष पूजा केली होती. ज्याचे फोटो समोर आले होते. आपल्यावरील साडे सातीचे संकट दूर होऊ दे यासाठी त्यांनी शनिदेवाला साकडं घातलं होतं. त्यांच्या नंदुरबार दौऱ्याची व शनिपूजेची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगल होती. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांकडून सुरू असलेल्या आरोपांच्या साडेसातीपासून कोकाटेंची सुटका शनिदेव करणार का? कोकाटे यांचे मंत्रिपद शनिदेव वाचवणार का? याची सर्वांना उत्सुकता होती. अखेर कोकाटेंना दिलासा मिळाल्याचे दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com