
BJP MLA Suresh Dhas Reacts to Munde’s Potential Cabinet Re-entry: महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच काहीतरी मोठी घडामोड होईल अशी चिन्हं आहेत. कारण, मागील काही दिवसांमध्ये ज्या पद्धतीने घडामोडी घडल्या आहेत. विशेष करून कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचं रम्मी प्रकरण समोर आल्यानंतर, ज्या पद्धतीने त्यांचं मंत्रिपद काढून घेण्याची मागणी सुरू आहे आणि याचबरोबर धनंजय मुंडे यांची पुन्हा मंत्रिमंडळात वर्णी लागेल असं अंदाज वर्तवले जात आहेत. त्यात आता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांसोबत बैठका सुरू केल्याचे दिसत आहेत.
त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळात काहीतरी बदल होतील असे अंदाज वर्तवले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मीडियाने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना, आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विशेष करून धनंजय मुंडेंना जर पुन्हा मंत्रिमंडळात जर घेतलं गेलं, तर तुमची भूमिका काय असणार? या प्रश्नावर धस यांनी अगदी रोखठोक उत्तर दिल्याचे दिसले.
सुरेश धस म्हणाले, ‘’नाही...नाही.. नाही आम्ही आमच्या पातळीवर मुख्यमंत्र्यांना जे बोलायचं ते बोलू. त्यांचा पक्ष त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष यांना आमचा बोलण्याचा तेवढा नैतिक अधिकार नाही. आमचा नैतिक अधिकार मुख्यमंत्र्यांपर्यंत आहे. हे जे लोक अतिशय चुकीच्या पद्धतीने वागतात, त्यांच्या स्वत:च्या मतदारसंघात इतक्या निघृणपणे बालाजी मुंडे, बापू आंधळे, महादेव मुंडे, संतोष देशमुख यामध्येही यांचेच सगळं सांभळाणारे माणसं आहेत. आणि जे हे आणि ते माझाच माणूस म्हणणारे, यांनाच परत जर संधी द्यायची असेल तर त्याबाबतीत आम्ही मुख्यमंत्र्यांना बोलू.’’
धनंजय मुंडे यांच्यावरचे आरोप बाजूला झाल्यानंतर त्यांना पुन्ह मंत्री करु, अशा आशयाचं विधान खुद्द अजित पवारांनी केलं होतं. त्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. राज्यभरात धनंजय मुंडेंविरोधात रोष असताना अजित पवारांनी मंत्रिपद देण्याविषयी बोललेच कसं? असा प्रश्न उपस्थित होत होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.