

Maharashtra Caste Validity Certificate Online Through CCVIS
esakal
राज्यातील विद्यार्थी आणि नागरिकांसाठी जातवैधता प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया आता अधिक सुलभ आणि जलद होणार आहे. जातवैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज करणे, आवश्यक कागदपत्रे सादर करणे, अर्जाची स्थिती तपासणे आणि सुनावणी या सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येणार आहेत. यासाठी राज्य सरकारने जात प्रमाणपत्र पडताळणी माहिती प्रणाली (CCVIS) विकसित केली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून जातवैधता प्रमाणपत्र थेट ईमेल आणि व्हॉट्सअॅपवर उपलब्ध करून देण्याची सुविधाही सुरू करण्याचे नियोजन आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा