Anemia Disease : मुंबईसह राज्यातील ५ वर्षांखालील मुलांमध्ये वाढते प्रमाण | Maharashtra children health update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 anemia

Anemia Disease : मुंबईसह राज्यातील ५ वर्षांखालील मुलांमध्ये वाढते प्रमाण

मुंबई : भारतातील पाच वर्षांखालील मुलांपैकी तब्बल 67% किंवा प्रत्येक 10 मुलांपैकी जवळपास सात मुलांमध्ये अॅनिमिया (Anemia disease in children) आहे असल्याची नोंद राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-5 (National family health survey) मध्ये करण्यात आली आहे. रक्तात पुरेशाप्रमाणात निरोगी लाल रक्तपेशी (Red blood cells) नसल्यामुळे अॅनेमियाचे प्रमाण जास्त वाढले आहेत. मुंबईत ही परिस्थिती आणखी वाईट आहे. शहरातील 72.8% मुलांना तर उपनगरात 65.6% अॅनेमियाग्रस्त मुले आहेत.

हेही वाचा: मोहने येथील 'त्या' मंदिराचे काम 100 टक्के होणारच - आमदार रमेश पाटील

अॅनिमिया शरीरातील लोहाच्या अपुऱ्या प्रमाणामुळे होतो. त्यामुळे धाप लागणे, हृदयाचे अनियमित ठोके किंवा कुपोषण यांसारखी लक्षणे दिसू शकतात. चांगला आणि लोहपूरक आहाराने यावर सहज उपचार करता येतात.तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, मातृ वय, शिक्षण आणि आर्थिक स्थिती यांसारख्या घटकांची भूमिका आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये 'नेचर' जर्नलमध्ये प्रकाशित हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या अभ्यासानुसार, " 2015 मध्ये, सर्वात श्रीमंत घरांमधील 52.9% मुले अॅनिमिया होती, तर सर्वात गरीब कुटुंबातील 63.2% मुले अॅनिमिया होती."

भारतातील 2005-06 राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण मध्ये असे दिसून आले की, भारतात 12 ते 23 महिने वयोगटातील किमान 80% मुले अशक्त होते. आणि 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये, 69.5% अॅनेमियाग्रस्त होते, अभ्यासात म्हटले आहे. बहुतांश राज्यांमध्ये अॅनेमियाचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्रात, 2015 मध्ये प्रसिद्ध झालेल्या राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण -4 मध्ये 53.8% वरून हे प्रमाण राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण -5 (2019-2021) मध्ये 68.9% पर्यंत वाढले. शहरी भागाच्या (66.3%) तुलनेत महाराष्ट्रातील ग्रामीण मुलांमध्ये (70.7%) ही स्थिती जास्त आहे. त्याच कालावधीत, पंजाबमध्ये 50.7% हे प्रमाण होते जे आता 71.1% वर पोहोचले आहेत. दिल्लीमध्ये 59.7% वरून 69.2% आणि तामिळनाडूमध्ये 50.7% वरून 57.4% पर्यंत वाढले आहे.

ज्येष्ठ बालरोगतज्ञ डॉ. विजय येवले यांनी सांगितले की, महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये बाधित मुलांची संख्या जास्त दिसत असली तरी बहुधा त्यांना सीमेवरचा अॅनिमिया आहे. अयोग्य आहाराच्या सवयींचा परिणाम आहे. मातेच्या स्तनपानातून बाळाला पोषक आहार मिळतो. पण, महिला बाळांना स्तनपान करत नाहीत. त्यातून पोषण मिळत नाही.

loading image
go to top