मोहने येथील 'त्या' मंदिराचे काम 100 टक्के होणारच - आमदार रमेश पाटील | KDMC | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MlA Ramesh Patil

मोहने येथील 'त्या' मंदिराचे काम 100 टक्के होणारच - आमदार रमेश पाटील

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज

डोंबिवली - कल्याण मोहने (kalyan-mohane) येथील बांधकामावर पालिका प्रशासनाने (kdmc Authorities) कारवाई केली. त्यानंतर माजी नगरसेवक मुकुंद कोट यांनी सहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांना मारहाण केल्यावर हा वाद आणखीनच चिघळला. सर्व पक्षीय आमदार मोहने ग्रामस्थांच्या बाजूने उभे राहिले. गुरुवारी विधान परिषदेचे आमदार रमेश पाटील (Mla Ramesh Patil) यांनी ज्यानी विना परवानगी मंदिर तोडलं त्याला तोडण्याची वेळ आता आली आहे, पुढील दोन दिवसात सर्वांनी एकत्र येऊन कल्याण बंद असे विधान करताच शुक्रवारी पालिका आयुक्त डॉ. सूर्यवंशी (Dr vijay suryawanshi) यांनी आमदारांची भेट घेत यावर योग्य ती चौकशी करण्यात येईल असे आश्वासन दिले. यामुळे मंदिर 100 टक्के होणारच अशी घोषणा आमदार रमेश पाटील यांनी कल्याणात केली.

हेही वाचा: विधानपरिषद : या दोन जागांसाठी भाजपने कोल्हापूरची जागा सतेज पाटलांसाठी सोडली!

कल्याण मोहने गावात केडीएमसीच्या वतीने एका बांधकामावर कारवाई करण्यात आली होती. या कारवाई नंतर संतप्त माजी नगरसेवक मुकुंद कोट यांनी पालिकेचे सहाय्यक आयुक्त राजेश सावंत याना मारहाण केली होती.या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हा वाद आणखीनच चिघळला.संतप्त ग्रामस्थांनी मंदिरावर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली. गुरुवारी मच्छीमार विक्रेत्यांना परवाना वाटपाच्या कार्यक्रमात कोळी महासंघाचे अध्यक्ष व विधान परिषदेचे आमदार रमेश पाटील यांनी "विना परवानगी मंदिर तोडलं त्यांना तोडण्याची वेळ आता आली आहे.

पुढील दोन दिवसात सर्वांनी एकत्र येऊन कल्याण बंद करायचं" अस वादग्रस्त विधान केलं होत. यानंतर शुक्रवारी विधानसभा आमदार रमेश पाटील यांच्यासह भाजप आमदार रवींद्र चव्हाण, शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर ,माजी आमदार प्रकाश भोईर यांच्यासह ग्रामस्थांनी केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली. भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना आमदार पाटील म्हणाले, पालिकेने मंदिराचे बांधकाम तोडल्याने ग्रामस्थांमध्ये चीड निर्माण झाली होती.

त्याला अनुसरून कल्याण बंदची हाक कार्यक्रमात दिली होती. याबाबत सकारत्मक निर्णय आज मिळाला आहे, मंदिर 100 टक्के होणार, मंदिरावर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याला बोलावुन घेत कारवाई करण्यात येईल अस आश्वासन आयुक्तांनी दिल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली. मात्र याविषयी आयुक्तांनी कोणतीही प्रतिक्रिया न दिल्याने हा वाद मिटला की आणखी चिघळणार याकडे लक्ष लागले आहे.

loading image
go to top