SSC Result 2023: दहावीचा निकाल उद्या १ वाजता पण गुणपडताळणी कशी करायची ? जाणून घ्या रिचेकिंगची प्रोसेस

दहावीच्या निकालाची प्रतिक्षा अखेर संपली
प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

दहावीच्या निकालाची प्रतिक्षा अखेर संपली आहे. निकाल उद्या म्हणजेच 2 जून रोजी १ वाजता निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्र बोर्ड पुणे कार्यालयातून सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर करणार आहे. निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करायची झाल्यास कशी करायची असा सवाल उपस्थित होत आहे. त्यासाठी पुढील माहिती. (Maharashtra Class 10th SSC Result 2023 Date and Time announced how to verify marks )

दहावीच्या निकालापूर्वी महाराष्ट्र बोर्डने गुणपडताळणी कशी करायची याची माहिती उपलब्ध करुन दिली आहे. SSC Result

प्रतिकात्मक
10th SSC Result 2023: उद्या १ वाजता लागणार दहावीचा निकाल, या वेबसाइटवर मिळेल संपूर्ण माहिती

जाणून घ्या गुणपडताळणी कशी करायची ?

ऑनलाईन निकालानंतर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इ. १० वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी ( श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन (http://verification.mh-ssc.ac.in) स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. SSC Result

यासाठी आवश्यक अटी / शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणीसाठी शनिवार, दिनांक ०३/०६/२०२३ ते सोमवार, दिनांक १२/०६/२०२३ पर्यंत व छायाप्रतीसाठी शनिवार, दिनांक ०३/०६/२०२३ ते गुरूवार, दिनांक २२/०६/२०२३ पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क (Debit Card / Credit Card / UPI / Net Banking) याद्वारे भरता येईल.

प्रतिकात्मक
Maharashtra SSC Result 2023 Live: दहावीचा निकालासंदर्भात मोठी बातमी

मार्च २०२३ परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे.

छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.SSC Result

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com