maharashtra politics: CM एकनाथ शिंदे यांच्या गुवाहाटी दौऱ्याबाबात मोठी अपडेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde

maharashtra politics: CM एकनाथ शिंदे यांच्या गुवाहाटी दौऱ्याबाबात मोठी अपडेट

गेल्या पाच महिन्यांपूर्वी राज्यात झालेल्या राजकीय उलथा-पालथला कारणीभूत ठरलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा गुवाहाटीला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान या दौऱ्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. (Maharashtra CM Eknath Shinde Guwahati Visit big update )

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री आणि आमदार, खासदार गुवाहाटीला जाणार आहे. मात्र, दौऱ्यामध्ये बदल करण्यात आला असल्याची माहिती, शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

भूमिपूजन सोहळ्यादरम्यान, गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. गुवाहाटी दौऱ्यामध्ये बदल झाला असल्याचे म्हटले आहे. शिंदे गटातील मंत्री व आमदार यांची 21 तारखेला गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार असल्याची चर्चा आहे मात्र 21 नोव्हेंबर ऐवजी लवकरच नवीन तारीख जाहीर होणार नवीन तारीख आल्यावर गुवाहाटी ला जाण्याबाबत निर्णय होईल असे गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

कामाख्या देवीचा नवस फेडणार

शिंदे गटातील आमदार बच्चू कडू यांनी सांगितलं, की गुवाहाटीला आम्ही सर्व आमदार जाणार आहेत. आम्ही सगळ्यांनी कामाख्या देवीला नवस केला होता. तो नवस या दौऱ्यात फेडणार आहे. राज्यात दिव्यांग मंत्रालय व्हावं, बळीराजाचं भलं व्हावं, यासाठी कामाख्या देवीला नवस केला होता.