Eknath Shinde : ‘वाढवण’मुळेे विकासाला गती ; शिंदे

‘‘वाढवण बंदर हा गेमचेंजर प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे पालघरमधील जनतेलाच सर्वांत जास्त फायदा होणार आहे. २०२९ पर्यंत हे बंदर विकसित होणार आहे. या बंदर प्रकल्पासाठी केंद्र सरकारने ७६ हजार कोटींची तरतूद केली आहे.
Eknath Shinde
Eknath Shindesakal
Updated on

पालघर : ‘‘वाढवण बंदर हा गेमचेंजर प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे पालघरमधील जनतेलाच सर्वांत जास्त फायदा होणार आहे. २०२९ पर्यंत हे बंदर विकसित होणार आहे. या बंदर प्रकल्पासाठी केंद्र सरकारने ७६ हजार कोटींची तरतूद केली आहे. जगातील ‘टॉप टेन’ बंदरांमध्ये या बंदराचा समावेश होणार असल्यामुळे ही देशासाठी अभिमानाची बाब असून ती पालघरमध्ये होत आहे हे आपले भाग्य आहे,’’असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज व्‍यक्त केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com