Eknath Shinde : दावोसला जाण्याऐवजी गुजरातला जा; संजय राऊतांचा टोला

दावोसमध्ये कसे करार आहेत हे आम्हालाही चांगलं माहित आहे, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
shinde Faction sheetal mhatre on sanjay raut comment on BJP raosaheb danve statement
shinde Faction sheetal mhatre on sanjay raut comment on BJP raosaheb danve statement Sakal

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दावोस दौऱ्यासाठी रवाना झाले आहे. उद्योगधंद्यांच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. मात्र याच दौऱ्यावरुन आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदेंवर टीका केली आहे.

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, "दावोसमधून काय येतंय माहित नाही पण नाकासमोरून जे उद्योग पळवून नेते ते आधी आणा - २ लाख कोटींहून अधिक गुंतवणूक गुजरात व इतर राज्य घेऊन गेले ते आधी आणा तर त्या दौऱ्याला अर्थ आहे. तिथे कसे करार होतात आम्हाला माहित आहे. आत्तापर्यंत तिकडे जाऊन कोणी किती करार केले किती कंपन्या आल्या हे कोणी सिद्ध करू शकलं नाही. पण आम्हाला डोळ्यासमोर दिसतं की महाराष्ट्रात आलेले प्रकल्प कोणीतरी घेऊन गेलं. त्यामुळे दावोसऐवजी गुजरातला जा."

दरम्यान, पुण्यामध्ये सध्या जी-२० परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या परिषदेमध्ये विविध देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहे. केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे हेदेखील या परिषदेमध्ये सहभागी झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com