तिसरी लाट रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सांगितला उपाय

cm uddhav thackeray
cm uddhav thackeray file photo
Updated on
Summary

गेल्या अनेक दिवसांपासून लॉकडाऊनमध्ये असलेल्या महाराष्ट्राच्या जनतेला आज लॉकडाऊनमधून सूट मिळण्याची आशा होती. पण, काळी बुरशीचे नव्याने उभे राहिलेलं संकट आणि तिसऱ्या लाटेची भीती यामुळे लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई- गेल्या अनेक दिवसांपासून लॉकडाऊनमध्ये असलेल्या महाराष्ट्राच्या जनतेला आज लॉकडाऊनमधून सूट मिळण्याची आशा होती. पण, काळी बुरशीचे नव्याने उभे राहिलेलं संकट आणि तिसऱ्या लाटेची भीती यामुळे लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधताना याबाबत घोषणा केली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत 15 दिवस लॉकडाऊन वाढवण्यावर सहमती झाली होती. यावर मुख्यमंत्र्यांनी आज शिक्कामोर्तब केले आहे. असे असले तरी कोरोना रुग्णांची घटती संख्या आणि लोकांचा वाढणारा दबाव पाहता निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. (maharashtra cm uddhav thackeray coronavirus lockdown extended)

मुख्यमंत्री म्हणाले की, अवघड असलेल्या गोष्टीला तुम्ही जिद्दीने सामोरे गेलात. कोरोना नियमांचे नागरिकांनी पालन केले, त्याचे परिणाम आपल्याला पाहायला मिळाले. त्यासाठी नागरिकांचे धन्यवाद. कोरोना रुग्णसंख्या घटत असली तरी निमय पाळणे आवश्यक आहे. आता राज्यात कठोर लॉकडाऊन लागू करणार नाही. पण, काही निर्बंध लावावे लागतील. काही जिल्ह्यांमध्ये रुग्णांची संख्या जास्त आहे. कोरोना विषाणू म्युटेंट झालाय, त्यामुळे तो झपाट्याने पसरत आहे. शिवाय रुग्णांना बरे होण्यासाठी जास्त वेळ लागतोय. ऑक्सिजनची आवश्यकता वाढली आहे. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे.

cm uddhav thackeray
राज्यात १५ जूनपर्यंत लॉकडाउन कायम - मुख्यमंत्री

जिल्ह्याचा आढावा घेऊन निर्बंध वाढवावे लागतील, काही जिल्ह्यात निर्बंध कमी करण्यात येतील. पण, संकट कमी झालं म्हणून रस्त्यावर उतरु नका. रस्त्यावर उतरायचं असेल तर कोरोना योद्धे म्हणून उतरा. राज्यात 15 दिवस लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. पण, निर्बंध काहीसे शिथील असतील. आजपर्यंत जसे सहकार्य केलं, तसंच यापुढेही करत रहां. पण, निर्बंध लादण्याच्या मताचा मी नाही. पण, कोरोनाचं भयंकर रुप पाहता काही निर्णय घ्यावे लागताहेत. गावामध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे कोरोनामुक्त गाव मोहीम आपण यशस्वीपणे राबवली तर तिसऱ्या लाटेला रोखता येईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.

पहिली लाटेचा प्रभाव वृद्धांमध्ये दिसला, त्यानंतर दुसऱ्या लाटेचा प्रभाव तरुणांमध्ये दिसला. त्यामुळे तिसरी लाट लहान मुलांमध्ये येण्याची शक्यता आहे. त्यामुळे बालरोगतज्ज्ञांचं कृतीदल तयार करण्यात आलं आहे. त्यामुळे तिसरी लाट आली तरी घाबरु नका. 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी राज्य सरकारवर आहे. एकरकमी 12 कोटी लस घेण्याची राज्याची तयारी आहे. पण, हे सर्व पुरवठ्यावर अवलंबुन आहे. जून महिन्यात लसीकरण पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे. , असंही ते म्हणाले.

राज्याची ऑक्सिजन निर्मिती क्षमता 1200 टन आहे, पण आपल्याला काहीकाळ 1700 टन ऑक्सिजन लागत होता. सध्या परिस्थिती सुधारत आहे. पण, काळजी आवश्यक आहे. तिसऱ्या लाटेसाठी आपल्याला तयार रहावं लागेल. कोरोनानंतर आता काळी बुरशीचं संकट पुढे आले आहे. कोविड झाल्यानंतर रुग्णांमध्ये साखरेचे प्रमाण वाढते. अशावेळी जास्त काळासाठी स्टेरॉईड दिल्यास, काळी बुरशी होण्यास सुरुवात होते, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

बारावीच्या परीक्षाबाबत केंद्राने धोरण ठरवायला हवं. संपूर्ण देशात एकच धोरण असावं. दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्याचा आहे. बारावीच्या परीक्षांबाबतही तसं करता येईल, पण याबाबत निर्णय केंद्राने घ्यावा. देशासाठी एक शैक्षणिक धोरण असावं. त्यासाठी शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांतिकारी निर्णय घेण्याची गरज आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

लॉकडाऊन असला तरी अर्थचक्र चालू राहिलं पाहिजे. सध्या जे कोरोनावर नियत्रंण आलं आहे, ते यश नागरिकांचं आहे. यापुढेही प्रत्येकाने माझं घर कोरोनामुक्त करण्याचं ठरवलं तर तर गाव, शहर कोरोनामुक्त होणं शक्य आहे. लॉकडाऊनमध्ये उद्योग क्षेत्रांना सवलती दिल्या. कोविड व्यवस्थापनाबाबत जगभरात महाराष्ट्राचं कौतुक होत आहे. आता शेतीची काम सुरु होतील. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, बंधन लादणार नाही, पण प्रत्येकाने काळजी घ्यावी, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय. अनाथ झालेल्यांसाठी सरकार योजना आणत आहे. अशा मुलांचे पालकत्व राज्य सरकार घेईन. अशा अनाथ बालकांना सरकार पाऊले पाऊली मदत करेल. यासाठी लवकरच योजना आणणार आहोत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com