आता शिवभोजन थाळी मिळणार १४ जूनपर्यंत माेफत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shivbhojan Thali

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली आहे.

आता शिवभोजन थाळी मिळणार १४ जूनपर्यंत माेफत

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात ‘ब्रेक द चेन’ (break the chain) अंतर्गत १५ एप्रिलपासुन विशेष निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या काळात काेणतीही व्यक्ती उपाशी राहू नये. यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकराने शिवभोजन थाळी (shivbhojan thali) मोफत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. या निर्णयामुळे गरजूंना एक वेळचे माेफत जेवण मिळू लागले. maharashtra cm uddhav thackeray decleares shivbhojan thali free till 14 june trending news

विशेष निर्बंध कालावधीमुळे एक महिना ही थाळी पुर्णपणे मोफत देण्यात आली. त्यानंतर पुन्हा त्याची कालमर्यादा वाढविण्यात आली. आज (शुक्रवार) पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवभाेजन थाळी माेफत देण्याची कालमर्यादा वाढवली. आता 14 जूनर्यंत शिवभाेजन थाळी माेफत मिळणार आहे.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पुढाकार घेऊन सादर केलेल्या प्रस्तावास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली असून विभागाने यासंबंधीचा निर्णय १४ मे ला निर्गमित केला आहे. ब्रेक द चेन प्रक्रियेअंतर्गत राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत या पार्श्वभूमीवर शिवभोजन थाळीच्या राज्याच्या प्रतिदिन संख्येतही दीडपट वाढ करण्यात आली आहे.

४८ लाखांहून अधिक नागरिकांनी घेतला नि:शुल्क भोजनाचा लाभ

राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी ब्रेक द चेन प्रक्रिया संपूर्ण राज्यभर राबविली जात आहे. या काळात राज्यातील गोरगरीब जनतेचे हाल होऊ नयेत याची काळजी शासनाने घेतली आहे.

शिवभोजन योजनेअंतर्गत नि:शुल्क थाळीचा लाभ

१५ एप्रिल २०२१ ते २० मे २०२१ पर्यंत ४८ लाख ४४ हजार ७०९ नागरिकांनी मोफत शिवभोजन थाळीचा लाभ घेतला आहे. या अडचणीच्या काळात मोफत शिवभोजन थाळीने राज्यातील गरीब जनतेला मोठा दिलासा दिला आहे.

योजनेत आतापर्यंत ४ कोटींहून अधिक थाळयांचे वितरण

योजना सुरु झाल्यापासून आतापर्यंत ४ कोटी २७ लाख ८१ हजार ३०६ थाळ्यांचे वितरण राज्यभरात झाले आहे. संपूर्ण राज्यात शिवभोजन योजनेअंतर्गत एकूण ९५० केंद्र सुरु आहेत अशी माहिती शासनाने दिली आहे.

ब्लाॅग वाचा

loading image
go to top