महाराष्ट्र गारठला; थंडीची लाट कायम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cold in maharashtra
महाराष्ट्र गारठला; थंडीची लाट कायम

महाराष्ट्र गारठला; थंडीची लाट कायम

पुणे - राज्याभरात मंगळवारी सकाळी कडाक्याची थंडी (Cold) पडल्याचे पाहायला मिळाले. बहुतेक भागात सरासरी किमान तापमान (Temperature) १० अंश सेल्सियसच्या जवळपास होते. बुधवार (ता. २६) पर्यंत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडीची लाट कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

मंगळवारी पुण्यात सरासरी किमान तापमान ८.५ तर राज्यात नाशिक येथे ६.३ अंश सेल्सियस नोंदविले गेले. पाकिस्तानातून आलेल्या सूक्ष्म धुलिकणांच्या वादळानंतर राज्यातील आकाश निरभ्र झाले. मात्र त्याचबरोबर दाट धुके आणि कडाक्याच्या थंडीने राज्य अक्षरशः गारठले. कोकण वगळता राज्यातील बहुतेक भागात सरासरी किमान तापमानात लक्षणीय घट झाल्याचे पाहायला मिळाले. शनिवार (ता.२९) पर्यंत राज्यातील हवामान कोरडे, तर किमान तापमानात उल्लेखनीय घट राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.

हेही वाचा: शरद पवारांच्या जिगरी दोस्ताला पद्मभूषण! पाठ थोपटत म्हणाले, 'मला अभिमान...'

पुणे शहरातील किमान तापमान (अंश सेल्सियस)

शिवाजीनगर : ८.५

पाषाण : ९.७

लोहगाव : १०.७

चिंचवड : १३.४

लवळे : १२.३

मगरपट्टा : १४.५

प्रमुख शहरांतील किमान तापमान (अंश सेल्सियस)

नाशिक : ६.३

मुंबई : १५.२

रत्नागिरी : १४.१

औरंगाबाद : ८.८

नागपूर : १०.६

सोलापूर : ११.२

चंद्रपूर : १३.२

जळगाव : ८.६

बुलढाणा : ९.२

Web Title: Maharashtra Cold Temperature Decrease

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top