शरद पवारांच्या जिगरी दोस्ताला पद्मभूषण! पाठ थोपटत म्हणाले, 'मला अभिमान...' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शरद पवारांच्या जिगरी दोस्ताला पद्मभूषण! पाठ थोपटत म्हणाले, 'मला अभिमान...'

शरद पवारांच्या जिगरी दोस्ताला पद्मभूषण! पाठ थोपटत म्हणाले, 'मला अभिमान...'

पुणे: आज सरकारकडून पद्म पुरस्कारांची (Padma Awards) घोषणा झाली आहे. यावर्षी चार जणांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे तर 17 जणांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. पद्मश्री पुरस्कार १०७ जणांना जाहीर झाला आहे. त्यामध्ये सायरस पूनावाला यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला आहे. बालाजी तांबे यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. कला क्षेत्रातून प्रभा अत्रे, राधेश्याम खेमका, संरक्षण क्षेत्रामधून बिपिन रावत, कल्याण सिंग यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. यांच्यासोबतच सोनू निगम, लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. (Padma Purskar)

हेही वाचा: असे आहेत २०२२ च्या पद्म पुरस्कारांचे मानकरी; वाचा सविस्तर

सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांचे वडील सायरस पुनावाला (Cyrus Poonawala) यांनाही वैद्यकीय क्षेत्रातील कामगिरीबद्दल पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे. त्यांचं कौतुक त्यांचे खूप आधीपासूनचे मित्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी केलंय. शरद पवार यांनी ट्विट करत म्हटलंय की, माझे बॅचमेट सायरस पूनावाला यांना वैद्यकीय क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे, त्याबद्दल मला अभिमान आहे.

शरद पवार आणि सायरस पुनावाला यांची मैत्री खूप जुनी आहे. शरद पवार राजकारणात यायच्या आधीपासून ते सायरस पुनावाला यांचे मित्र आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या मित्राला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल आपल्याला अभिमान असल्याचं म्हटलंय. पुनावाला हे आता वैद्यकीय क्षेत्रात असले तरी आधी ते रेससाठी लागणाऱ्या घोड्यांची पैदास करण्याच्या व्यवसायात होते.

Web Title: Sharad Pawar Best Friend Cyrus Poonawala Gets Padma Bhushan So Proud Of My Batchmate

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..