

Maharashtra Cold Wave Intensifies Across North Maharashtra
esakal
राज्यात सध्या गुलाबी थंडीने जोर धरला असून उत्तर महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये किमान तापमानाचा पारा घसरला आहे. गेल्या 24 तासांत जळगाव येथे राज्यातील सर्वात कमी म्हणजेच 8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढल्याचे चित्र आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, 23 ते 25 नोव्हेंबर या कालावधीत राज्यातील बहुतांश भागांत हवामान कोरडे आणि निरभ्र राहण्याची शक्यता आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा