

Residents experience intense cold as minimum temperatures drop sharply across Maharashtra, triggering cold wave–like conditions in several districts.
esakal
राज्यात कडाक्याची थंडी दिवसेंदिवस वाढत असून, किमान तापमानातात घट झाल्यामुळे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक भागात 'थंडीच्या लाटेसारखी' परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने आज (ता. ११) राज्यातील किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता वर्तवली असून, गारठा कायम राहणार असल्याचे सांगितले आहे.