

Maharashtra Weather Cold Wave
esakal
Cold Wave In Maharashtra : राज्यात मागचा आठवडाभर थंडीच्या लाटेने अनेक जिल्ह्यात हाडे गोठवणारी थंडी पडली होती. दरम्यान मागच्या २४ तासांपासून थंडीची लाट कमी आली आहे. उत्तरेतील राज्यात शीत वाऱ्यांचे प्रवाह कमी झाल्याने थंडी काही अंशी कमी आल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान राज्यातील जेऊर, धुळे, निफाड, परभणी (कृषी) , या ठिकाणी थंडीची लाट कायम आहे. उर्वरित राज्याच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. हवामान विभागाने गारठा कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.