
नाना पटोलेंना हाय कमांडने फटकारलं, दिल्लीत काय घडलं? वाचा सविस्तर
राज्यातील सहा विधानपरिषद निवडणुकांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला मार खावा लागला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे नागपूरच्या जागेवरून काँग्रेसची नाचक्की झाली. त्यामुळे भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंचा एकहाती विजय झाला. दरम्यान, यावरून काँग्रेस हायकमांडने नाना पटोले यांना सुनावलं आहे.
राज्यात आजपासून हिवाळी अधिवेशन (Assembly Winter Session 2021) पार पडतंय. मात्र अधिवेशनासाठी पूर्णवेळ अध्यक्ष नाही. रिक्त जागा काँग्रेसची असल्याने त्यासाठी कोण दावा करणार, याकडे अद्याप सगळ्यांचं लक्ष लागून आहे. याच पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिल्लीला धाव घेतली. त्यानंतर नागपूर विधानपरिषद निवडणुकीवरून हायकमांडने त्यांना फटकारल्याचं समोर आलं. (Nagpur MLC election)
अध्यक्षाची जागा भरली जाणार असून आज दिल्लीतील मीटिंगमध्ये त्यासंदर्भात बैठक होणार आहे. हायकमांडने दिलेला निर्णय मान्य असेल, असं पटोले म्हणाले. या निर्णयानंतर पटोले यांच्याविरोधात पक्षात काही जण नाराज असल्याचंही बोललं जातंय. आणि सुनिल केदार व नितीन राऊत यांच्याकडून संबंधित प्रकरणात महत्वाची माहिती मागवण्यात आली आहे.
नक्की काय घडलं?
विधानपरिषदेच्या नागपूर जागेसाठी काँग्रेसने स्वतचा उमेदवार देण्यासाठी भाजपचे नगरसेवक छोटू भोयर यांना फोडलं. त्यांना काँग्रेसकडून तिकीट देण्यात आलं. मात्र, मतदानाच्या एक दिवस आधी भोयर यांनी माघार घेतली. त्यांनी निवडणूक लढणार नसल्याचं जाहीर केलं. यामुळे काँग्रेसची नाचक्की झाली. ऐनवेळी पक्षाला अपक्ष उमेदवारा पाठिंबा द्याला लागला.