Congress: नाना पटोलेंना हटवा; काँग्रेसच्या २४ नेत्यांनी बांधली मूठ

नाना पटोले यांच्या अडचणीत वाढ
nana patole,Congress
nana patole,Congressesakal

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. मागील काळात पक्षांतर्गत वादात केंद्रातील नेत्यांनी हस्तक्षेप केला तरी देखील हा वाद थांबायचं नाव घेत नाही.

मात्र आता थेट नाना पटोलेंना प्रदेश अध्यक्षपदावरुन हटवा आणि शिवाजीराव मोघेंना अध्यक्ष करा, अशी मागणीच विदर्भातील 24 मोघे समर्थकांनी केली आहे.

nana patole,Congress
"म्हणून मी काँग्रेसचा प्रचार करतोय..." भाजपचा कट्टर नेता कसब्यात धंगेकरांच्या प्रचाराला Kasba Bypoll Election

तर त्यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत की, पटोले यांनी काँग्रेसमध्ये गटबाजी आणली, पक्षात दलित-मुस्लिम आणि आदिवासी यांना दूर केले. त्यामुळं आता पुढचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आदिवासी समाजातूनच करावा, अशी मागणी काँग्रेसचे निरिक्षक रमेश चेन्निथला यांच्याकडे करण्यात आली आहे.

nana patole,Congress
Dada Bhuse | व्यवस्थित मांडणी केल्याने मिळाले धनुष्यबाण, पक्षही : दादा भुसे

पटोले यांच्यामुळे पारंपारीक मतदार असलेले दलित, मुस्लीम आणि आदिवासी दुरावले आहेत. असा दावा शिवाजीराव मोघेंच्या समर्थकांनी केला आहे.

तर नाना पटोले पक्षाच्या बैठकीत कोणाचं ऐकत नाही, असा देखील त्यांच्यावर करण्यात आला आहे. मात्र आता रमेश चेन्निथला याबाबत काय निर्णय घेणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com