Dada Bhuse | व्यवस्थित मांडणी केल्याने मिळाले धनुष्यबाण, पक्षही : दादा भुसे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dada Bhuse & Eknath Shinde

Dada Bhuse | व्यवस्थित मांडणी केल्याने मिळाले धनुष्यबाण, पक्षही : दादा भुसे

नाशिक : केंद्रीय निवडणूक आयोगाकडे कायदेशीर मांडणी केल्यामुळेच धनुष्यबाण चिन्ह मिळाले. सर्वोच्च न्यायालयातही न्याय मिळेल, असा विश्वास पालकमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला. (Dada Bhuse statement regarding shivsena party logo captured nashik political news)

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

श्री. भुसे यांनी गुरुवारी (ता. २३) नाशिक महावितरण कंपनीच्या कामकाजाचा आढावा घेतला. या बैठकीनंतर भुसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. श्री. भुसे म्हणाले, की खासदार संजय राऊत यांचे धमकी प्रकरण हे प्रसिद्धीचा केविलवाणा प्रयत्न आहे.

मुंबईची एजंटगिरी करण्यासाठी ते नाशिकला येत असतील, अशा शब्दांत भुसे यांनी राऊतांवर टीका केली. सर्वोच्च न्यायालयात आमदार अपात्रतेच्या सुनावणीबाबत त्यांना विचारले असता लोकशाही प्रक्रियेत सर्वांनाच न्याय मागण्याचा अधिकार आहे.

आपला देश घटना, नियम आणि कायद्यावर चालतो. न्यायालयात कायद्यानुसार न्यायनिवाडा होऊन आम्हाला न्याय मिळेल, असे भुसे म्हणाले. लोकशाही प्रक्रियेत संख्येला अधिक महत्त्व आहे. त्यासाठीची खासदार, आमदार व पदाधिकाऱ्यांची संख्या आमच्याकडे जास्त आहे. त्या आधारावर केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय केल्याचा दावा भुसे यांनी केला.