esakal | Corona Update: राज्यात रुग्णसंख्येत वाढ; 816 जणांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

corona

Corona Update: राज्यात रुग्णसंख्येत वाढ; 816 जणांचा मृत्यू

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई- महाराष्ट्रात (maharashtra corona update) गेल्या 24 तासांत 46 हजार 781 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर 58 हजार 805 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांचा डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 816 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या कोरोनाचे 5 लाख 46 हजार 129 नवे कोरोनाबाधित रुग्ण आहेत. आतापर्यंत 52 लाख 26 हजार 710 कोरोना रुग्णांची राज्यात नोंद झाली आहे, तर 46 लाख 00 हजार 196 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत 78 हजार 007 रुग्णांचा विषाणूने जीव घेतलाय. (maharashtra corona update Active COVID19 cases rajesh tope health ministry)

पिंपरी चिंचवड मनपा 3152, अहमदनगर 2381,मुंबई 2,104 येथे सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. आज दिवसभरात 58,805 रुग्ण बरे होऊन घरी गेले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या  46,00,196 इतकी आहे.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून ते 88.01 % एवढे झाले आहे.राज्यात मृतांचा आकडा पुन्हा एकदा वाढला असून आज 816 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. मुंबई मध्ये सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली असून येथे 66 मृत्यू नोंदवण्यात आले. तर बीड 50,नाशिक मनपा 41,पुणे मनपा 40,नाशिक 34 मृत्यू झाले.  मृत्यूचा दर 1.49 % इतका आहे.

हेही वाचा: 'आपण फिट म्हणून कोरोना होणार नाही, भ्रमात राहु नका'

आज नोंद झालेल्या 816 मृत्यूंपैकी 387 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 193 मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.तर 236 मृत्यू हे आठवड्यापेक्षा अधिक कालावधी पूर्वीचे आहेत. राज्यात आज रोजी एकूण 5,46,129 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,01,00,958 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 52,26,710 (17.36 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 36,13,000व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 29,417 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

loading image
go to top