
'आपण फिट म्हणून कोरोना होणार नाही, भ्रमात राहु नका'
मुंबई - तुम्हाला शाहरुख खानचा चैन्नई एक्सप्रेस (chennai express) नावाचा चित्रपट आठवतो का, त्यात तंगा बलीचा रोल करणारा अभिनेता म्हणून निकितन धीरची (nikiten dhir) चर्चा झाली होती. त्यामुळे त्याला मोठी लोकप्रियताही मिळाली होती. आता तो चर्चेत आला आहे याचे कारण वेगळे आहे. त्यानं त्याच्या चाहत्यांना कोरोनापासून वाचण्यासाठी आवाहन केले आहे. त्यासाठी काय काळजी घ्यायला हवी हे त्यानं सांगितलं आहे. सध्या कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतो आहे त्याला सामोरं जाण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. अजूनही व्हॅक्सिनेशनचा (vaxination) प्रश्न सुटलेला नाही.
निकीतननं कोरोनाच्या वाढणा-या कहर विषयी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यानं म्हटलं आहे की, तुम्हाला जर असे वाटत असेल की आपण प्रचंड फिट आहोत आणि आपल्याला कोरोना होणार नाही. तर हा तुमचा गैरसमज आहे. त्याचा फटका तुम्हाला बसल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही काळजी घेण्याची गरज आहे. आपण तंदुरुस्त आहोत या भ्रमात राहु नका. ते जास्त धोकादायक आहे. जे लोक सर्वात फिट आहे त्यांच्यात कोरोनाच प्रमाण जास्त आहे. त्यामुळे आपल्याला काहीही होणार नाही या भ्रमात राहु नका.
निकीताननं सांगितलं की, आता आपली प्राथमिकता सुरक्षा आणि आरोग्याला द्यायला हवी. कारण यापूर्वी अशी महामारी आली नव्हती. माझ्या नानीनं दुसरं महायुध्दही पाहिलं होतं. मात्र तिचं म्हणणं असं आहे की, असा आजार यापूर्वी पाहिला नव्हता. माझ्या आई वडिलांनी कोरोनाचे दुसरे व्हॅक्सिन घेतले आहे. त्यांचे वडिल पंकज धीर हे सध्या कानपूरमध्ये आहेत.
हेही वाचा: मुलीच्या किसिंग सीनवर वडिल काय म्हणतील?, आईनं दिल उत्तर...
हेही वाचा: पूजाची गोष्टच निराळी, फोटोंवरुन नजर हटते कुठे?
निकीतानच्या प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास त्यानं आशुतोष गोवारिकरच्या जोधा (jodha akbar) अकबर पासून सुरुवात केली होती. त्यात त्यानं शरिफद्दीनची भूमिका केली होती. त्या भूमिकेचे प्रेक्षकांनी कौतूक केले होते.
Web Title: Nikitin Dheer Says Fitness Not Protect You From
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..