esakal | राज्यातील 6 जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णवाढीचा दर सर्वाधिक
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Corona Update

राज्यातील 6 जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णवाढीचा दर सर्वाधिक

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णवाढीचा (corona patients) दर हा देशाच्या तुलनेत कमी असला तरी असे 6 जिल्हे (huge patients in six district) आहेत, जिथे अजूनही रुग्णवाढ मोठ्या संख्येने होत आहे. त्यामुळे, आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी (health department) याबाबत चिंता व्यक्त करत याच जिल्ह्यांतून तिसऱ्या लाटेची (corona third wave) किंवा दुसऱ्या लाटेत कमी झालेली संख्या पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती व्यक्त केली आहे.

हेही वाचा: सकाळी मीडियाचा अजेंडा ठरवून सरकार चालत नाही- प्रविण दरेकर

सध्या राज्याच्या रुग्णवाढीचा दर हा 0.07 टक्के एवढा आहे. पण, राज्याच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये रुग्णवाढीचा दर हा सरासरीपेक्षा अधिक सर्वाधिक आहे. राज्यातील अहमदनगर, सातारा, सोलापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या 6 जिल्ह्यांमध्ये राज्याच्या इतर जिल्ह्यांच्या सरासरीच्या तुलनेत अधिक रुग्णवाढीचा दर आहे. तसंच, अहमदनगर आणि सातारा हे दोन्ही जिल्हे सध्या काळजी करण्याचे जिल्हे असल्याचेही आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

अहमदनगर मध्ये सर्वाधिक 0.25 टक्के एवढा रुग्णवाढीचा दर आहे. त्याखालोखाल साताऱ्यात 0.19 टक्के, सोलापूरमध्ये 0.19 टक्के, सांगलीत 0.15 टक्के, रत्नागिरीत 0.13 टक्के आणि सिंधुदुर्गमध्ये 0.09 टक्के एवढा रुग्णवाढीचा दर आहे. दरम्यान, बाकी इतर जिल्ह्यांध्ये रुग्णवाढीचा दर हा सरासरीपेक्षा कमी असून 0.06 एवढा किंवा त्यापेक्षा ही खाली आहे.

मुंबईचा रुग्णवाढीचा दर 0.05 टक्के

राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार मुंबईत जरी रुग्णसंख्या वाढत असली तरी रुग्णवाढीचा दर सरासरीपेक्षा कमी असून ही एक दिलासादायक बाब असल्याचे ही म्हणणे आहे. सध्या मुंबईच्या रुग्णवाढीचा दर हा 0.05 टक्के एवढा आहे. तर, त्याखालोखाल पालघर 0.03 टक्के, नाशिक, औरंगाबाद , लातूर आणि बुलढाण्याचा 0.02 टक्के एवढा रुग्णवाढीचा दर आहे.

हेही वाचा: चांदीवाल आयोगाकडून परमबीर सिंह यांच्या विरोधात जामिनपात्र वॉरंट जारी

पुण्यात सर्वाधिक पॉझिटिव्हीटी दर

पुण्यात सर्वाधिक पॉझिटिव्हीटी दर असल्याचे आकडेवारीनुसार स्पष्ट होत आहे. सध्या पुण्यात 6.58 टक्के पॉझिटिव्हीटी दर आहे. त्याखाली अहमदनगरमध्ये 5.08 टक्के पॉझिटिव्हीटी दर आहे. दहा दिवसांपूर्वी एकही असा जिल्हा नव्हता जिथे पॉझिटिव्हीटी दर हा 5 टक्क्यांपेक्षा जास्त होता. पण, आता हे दोन जिल्हे आहेत जिथे हा दर दिवसेंदिवस वाढत आहे. तर, एकूण आठ जिल्हे आहेत जिथे पॉझिटिव्हीटी दर जास्त असून इथे अधिकची काळजी घेण्याचे आवाहनही प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, सिंधुदूर्ग, उस्मानाबाद, रत्नागिरी आणि नाशिक या जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी दर जास्त आहे.

या जिल्ह्यांसाठी सतर्कता आवश्यक

गणेशोत्सवासाठी याच जिल्ह्यांमध्ये लोकांची ये-जा सुरु होणार आहे. आणि त्यातून पुन्हा कोविड रुग्ण वाढू शकतात. त्यामुळे, या जिल्ह्यांमध्ये गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. शिवाय, प्रशासकीय पातळीवरही सतर्कता बाळगणे गरजेचे आहे असे कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले आहे.

loading image
go to top