Corona Update : राज्यात 43,211 नवीन कोरोना रुग्ण, तर 19 जणांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Test

Corona Update : राज्यात 43,211 नवीन कोरोना रुग्ण, तर 19 जणांचा मृत्यू

मुंबईत शुक्रवारी 11,317 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून तब्बव नऊ जणांचा मृत्यू झाला. यापैकी 84 टक्के रुग्ण हे लक्षणे नसलेले होते. शुक्रवार संध्याकाळपर्यंत एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 84,352 होती. तर राज्यात आज 43,211 नवीन कोरोना रुग्ण आढळले, तर 19 मृत्यूची नोंद झाली. (Maharashtra Latest Corona Updates In Marathi)

शुक्रवारी दिवसभरात तब्बल 33,356 रुग्ण बरे झाले आहेत, दरम्यान राज्यात कोरोना सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ही 2,61,658 वर पोहचली आहे. आज नोंदवल्या गेलेल्या ओमिक्रॉन रुग्णांची संख्या 238 होती, ज्यामुळे राज्यात एकून ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या 1605 झाली आहे.

13,702 प्रकरणांसह, मुंबईत आदल्या दिवसाच्या तुलनेत गुरुवारपेक्षा रुग्णांमध्ये 16.55% ची घट नोंदवली गेली . मात्र ही घसरण राज्याच्या संख्येत दिसून आली नाही कारण गुरुवारी महाराष्ट्रात पुन्हा 46,406 हून अधिक रुग्णसंख्या नोंदवली गेली.

राज्याचा मृत्यूदर 1.98 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 67 लाख 17 हजार 125 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.28 टक्के आहे. सध्या राज्यात 19 लाख 10 हजार 361 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 9286 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत

हेही वाचा: फ्लिपकार्ट, ॲमेझॉन वर 17 जानेवारीपासून रिपब्लिक डे सेल! मिळेल बंपर सूट

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top