पॉझिटिव्हीटी दर 5 टक्क्यांहून कमी; 11 जिल्ह्यांत मात्र कोविडचा धोका कायम | Maharashtra corona update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona-patient

पॉझिटिव्हीटी दर 5 टक्क्यांहून कमी; 11 जिल्ह्यांत मात्र कोविडचा धोका कायम

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : महाराष्ट्रातील सरासरी कोविड साप्ताहिक रुग्णांपेक्षा (corona patients) 11 जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त रुग्णांची नोंद झाली आहे.  या 11 जिल्ह्यांमध्ये साप्ताहिक पॉझिटिव्ह कोविड दर (Corona positive rate weekly) नोंदवला गेला आहे जो राज्याच्या सरासरी 1.02% पेक्षा जास्त आहे.

हेही वाचा: मुंबई : 26 /11 च्या शहिदांना मुंबई पोलिसांनी वाहिली श्रद्धांजली

सर्वाधिक सकारात्मकता दर असलेल्या जिल्ह्यांमध्ये अकोला (2.77%), अमरावती (2.56%), बुलढाणा (2.33%), सिंधुदुर्ग (2.21%), पुणे (2.07%), बीड (1.79%), नाशिक (1.87%), सोलापूर (1.39%), पालघर (1.34%), अहमदनगर (1.31%) आणि सांगली (1.09%) यांचा समावेश आहे. दरम्यान, अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापैकी कोणत्याही जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी दर 5 टक्क्यांपेक्षा जास्त नाही, ज्यातून कोविड-19 विषाणू नियंत्रणात असल्याचे समोर येते.

राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ प्रदीप आवटे यांच्या म्हणण्यानुसार " एकूण पॉझिटिव्हीटी दरात घट झाली आहे आणि 5% पेक्षा जास्त पॉझिटिव्हीटी दर असलेले कोणतेही जिल्हे नसल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात असल्याचे दिसून येते. नेहमीच उच्च पॉझिटिव्हीटी दर दर्शवणाऱ्या जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित करत असतो आणि संख्या कमी करण्यासाठी अनेक पावले उचलत असतो."

महाराष्ट्रात नवीन तसेच सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. सध्या केरळनंतर सक्रिय प्रकरणांमध्ये राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर,  मृतांचा आकडा आता 1,40,857 वर पोहोचला असून पुण्यात 19, 694 मृत्यू, त्यानंतर मुंबई 16,319 आणि ठाण्यात 11,558 मृत्यू झाले आहेत. सर जेजे रुग्णालयातीस मेडिसिनचे प्राध्यापक डॉ. विकार शेख यांनी सांगितले की, रुग्णांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पावले उचलली नाहीत तर पुढील वर्षी तिसरी लाट येऊ शकते. सध्या दुसऱ्या लाटेचे शेपूट लांबले आहे. त्यामुळे, तिसऱ्या लाटेला विलंब झाला आहे. तिसर्‍या लाटेचा प्रभाव कमी करणे हे खरे आव्हान आहे. युरोपमध्ये सध्या चौथी लाट सुरू आहे. तिथे रुग्ण आणि मृत्यूही वाढले आहेत.

loading image
go to top