Maharashtra Court Employees Strike
esakal
राज्यातील कनिष्ठ न्यायालयांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी संघटनेने मंगळवारपासून (ता. १७) बेमुदत संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. या संपात राज्यभरातील सुमारे ३४ हजार कर्मचारी सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेने दिली आहे. त्यामुळे न्यायालयीन कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे.