esakal | Corona Update: राज्यात बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त; 895 रुग्णांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

esakal

महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या स्थिरावताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 66 हजार 358 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर 67 हजार 752 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे

Corona Update: राज्यात बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त; 895 रुग्णांचा मृत्यू

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

मुंबई- महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या स्थिरावताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 66 हजार 358 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर 67 हजार 752 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मंगळवारी 895 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. सोमवारी राज्यात 48 हजारांच्या जवळपास कोरोना रुग्ण सापडले होते. सर्वसाधारणपणे राज्यात 60 हजारांच्या पुढे कोविड रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या स्थिरावताना दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली आहे.

राज्यात आज 895 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. मृत्यूचा दर 1.5 % इतका आहे. राज्यात दिवसभरात 66,358 नवीन रुग्णांची नोंद झाली. करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 44,10,085 झाली आहे. रुग्णवाढ स्थिर असली तरी मृतांचा वाढला आहे. आज नोंद झालेल्या 895 मृत्यूंपैकी 392 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 179 मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.तर 324 मृत्यू हे आठवड्यापेक्षा अधिक कालावधी पूर्वीचे आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.5 % एवढा आहे. राज्यात आज रोजी एकूण 6,72,434 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,62,54,737 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 44,10,085 (16.80 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 42,64,936 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 30,146 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

हेही वाचा: Corona Update : पुण्यात कोरोनामुक्तांच्या संख्येत मोठी वाढ

दिवसभरात 67,752  रुग्ण कोरोनामुक्त

आज 67,752 रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण 36,69,548 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.21 % एवढे झाले आहे.

loading image