
राज्यात कोराना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मंगळवारी राज्य सरकारने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, कोरोनाचे ८६ नवीन रुग्ण आढळले आहेत. यामध्ये मुंबईतील २६, ठाण्यातील नऊ, नवी मुंबईतील सहा, पुण्यातील २७, पिंपरी-चिंचवडमधील तीन, कोल्हापूरमधील दोन, सांगलीतील पाच आणि नागपूरमधील दोन रुग्णांचा समावेश आहे. दिलासादायक बातमी अशी आहे की ४३५ रुग्ण कोविडमधून बरे होऊन रुग्णालयातून घरी परतले आहेत. यासह, राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या आता ५९० वर आली आहे.